https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/issue/feed AGPE THE ROYAL GONDWANA RESEARCH JOURNAL OF HISTORY, SCIENCE, ECONOMIC, POLITICAL AND SOCIAL SCIENCE 2021-12-27T04:56:31+00:00 Dr. Vikrantshah Atram vikrantshah.atram@gmail.com Open Journal Systems
AGPE The Royal Gondwana Research of History, Science, Economic, Political and Social Science is Online & print research Journal| Journal is Multidisciplinary | A Peer Reviewed and open access indexed research journal | Our Journal is devoted to Professors, Research Scholars, Students, Teachers, Educationists for the recent studies & research.

ISSN (P): 2582-8800

ISSN (E): Applied

Frequency: Annual

Publishing body: Adivasi Gondwana Bhasha Prachar Bahuudheshiya Shikshan Sanstha Tipagad Warora.

Chief Editor: Gondraje Dr. Birshah Atram
Founder & President of Trust.

Starting year: 2019

Subjects: Multidisciplinary

Accepted languages: English, Hindi and Marathi (Multiple)

Publication format: Print and Online

Email: agpe.researchjournal@gmail.com

Website: www.agpegondwanajournal.co.in

Address: Near St. Alphonsa’s Public School Warora,
Mitra Chowk, Warora - 442907, Dist. Chandrapur,
Maharashtra State, India

Type of articles: Research Papers, Survey Papers, Review Papers, Informative article, Case studies, Short report and Comparative studies.

Inauguration of AGPE The Royal Gondwana Research Journal in Gondwana University, Gadchiroli (Maharashtra State)

Scope of Research papers (Click here)
https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/75 गोंड गण समाज मे धर्मांतर का परीणाम – सामाजिक विश्लेषन 2021-12-25T06:59:51+00:00 Aniket Deshmukh aniket777Deshmukh@gmail.com
गोंड गण समाज एवं उसके 47 उपशाखाओं में जाति प्रथा का कोई औचित्य नहीं है। जाति प्रथा यह गैरगोंड समाज में हिंदू संस्कृति के वैदिक धर्म में आती है जो चतुर्वर्ण को प्रकट करती है और परंपरा से आर्य मनुवादी को उपयोग में लाती हैं। जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र इन चार स्तरों पर वर्तमान में भी हिंदू संस्कृति में अस्तित्व में है।
गोंड गण समाज में चतुर्वर्ण व्यवस्था पर समाज व्यवस्था ना होकर उनके गण देवी-देवताओं पर स्थापित की है। गोंडी संस्कृति पूर्णत: प्रकृति पर आधारित है इसीलिए किसी भी प्रकार के धर्मांतरण का या जाति व्यवस्था कि यहां पर प्रयुक्तता नहीं है। कोई भी गण आपस में एक दूसरे के साथ ऊंच-नीच नहीं मानता भाईचारे का रिश्ता एवं संबधी का रिश्ता इन गणों में वर्तमान में भी अस्तित्व में है। जो प्राचीन युगो से सदा हराभरा है।
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/76 गोंड जमातीच्या प्राचिन युध्दकलांचे अध्ययन 2021-12-25T07:03:52+00:00 Naresh Kulkarni nareshkulkarni1988@gmail.com
संरक्षणव्यवस्था किंवा युद्धसंस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. आधुनिक सामाजिक विज्ञानात समाजमान्य अशा नियमांनुसार किंवा संकेतानुसार सुरू झालेल्या आणि चालवलेल्या सशस्त्र संघर्षालाच युद्ध अशी संज्ञा देतात. रूढी किंवा प्रथा अथवा कायदा यांनी मान्य केलेली एक संस्था म्हणून ते युद्धाकडे पाहतात. युद्धशास्त्रज्ञ ही संज्ञा दोन गटांतील सशस्त्र संघर्षाला उद्देशून वापरतात.

प्रबळ अशा देशांनी आदिम अप्रगत अशा लोकांशी केलेले सशस्त्र झगडे हे लष्करी मोहिमा म्हणून निर्दिष्ट करण्यात येतात तर प्रबळ राष्ट्रांचे लहान देशांबरोबरचे लढे हे लष्करी हस्तक्षेप किंवा धडा शिकविण्यासाठी केलेली चढाई किंवा बदला या नावांनी ओळखले जातात. देशांतर्गत उठावाला यादवी युद्ध वा बंड अशी नावे देण्यात येतात. तथापि युद्धासंबंधी या वेगवेगळ्या भाषिक प्रयोगांची वर्णने अगदी काटेकोर अर्थाने सर्वमान्य ठरत नाहीत. कारण ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची आहे. या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या युद्ध संकल्पनेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/77 गोंड समाजाचे सांस्कृतिक आधार व सिदधांत 2021-12-25T07:07:28+00:00 Pralhad Markam markampralhad.smm@gmail.com
गोंडवाना साम्राज्यातील बहुसंख्येने असलेल्या जमाती गोंड व त्याच्या ४७ गण समूहाच्या आहे. मध्य भारतासह पश्चिम बंगाल, युपी पासून दक्षिण कर्नाटक पर्यंत पसरलेल्या या जमातींची प्राचीन संस्कृती व कला यावर आपण संशोधनात्मक लेखनावर अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत या प्राचीन जमातीची वेगवेगळी कला यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता या प्राचीन जमातीची संस्कृतीयाकडे आपण अभ्यासू नजरेने बघणार आहोत. जगात व नवभारतात असंख्य वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहे परंतु परंपरागत अस्तित्वात असलेली ही प्राचीन संस्कृती वर्तमानातील विज्ञान युगातही टिकून असलेली आपणास बघावयास मिळते आहे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मिस्त्र देश, सिरीया देश, रोम देश त्यातील संस्कृतीचे विस्मरण बरेच अंशी झालेले आढळून येते.
या नवभारत देशात ज्या संस्कृती होत्या त्या प्राचीन काळातील म्हणजेच आर्य येण्याच्या अगोदरच्या होत्या. त्या कमी-जास्त अस्तित्वात आहेत काही वर आर्यांनी अतिक्रमण करून व आत्मसात करून त्यावर आपल्या वैदिकतेचा प्रभाव टाकलेला आहे मात्र या देशाच्या पूर्व भागातील व मध्य भागातील अनार्य संस्कृतीवर त्या आर्यांचा प्रभाव पडू शकला नाही.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/78 गोंड समाजातील पारंपारिक आभूषण कलेचे अध्ययन 2021-12-25T07:15:41+00:00 Manish Madavi manish99.madavi@gmail.com
गोंडवाना साम्राज्यातील युवक व युवती यांना तसेच प्रोढ स्त्रिया व पुरुषांना आभूषण घालण्याची व दररोजच्या जीवनात उपयोगात आणण्याची फारच आवड असते. त्यामुळे या जमातीत धातू आभूषणे हाताने बनवून ती वापरली जातात. हा समाज फारच आर्थिक व्यवस्थेत मागासलेला असल्याने सोन्यासारखा धातूंचे दागिने घालने यांना परवडण्यासारखे नाही म्हणून ते जास्तीत जास्त पितळ, चांदी, तांबे या धातूपासून बनविलेले दागिने घालतात. आधुनिक जगतातील मशीनद्वारे बनविलेले दागिने जरी सुंदर व आकर्षक वाटत असली तरीही ही जमात स्वहस्ते निर्मित दागिने घालण्यात खूप आनंदी राहते.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/79 प्राचिन जनजातिय तंत्रकलेचे स्वरूप व त्याचा प्रभाव 2021-12-25T07:26:49+00:00 Priyanka Uike priyanka.uike1988@gmail.com
लोकांनी नैतिक आचरण करून धार्मिक व सेवाभाव मानवतेचे पालन करणे हे होय. प्राचीन काळात राजेशाही होती व सतत आपसात राजांचे युद्ध होई व या युद्धात विजय मिळवणे त्यास अगत्याचे वाटत असे. इतकेच नाही तर स्वतःचे राज्य किंवा स्वतःचा देश वाचवणे राजास फारच महत्त्वाचे असे. त्याच्या अस्तित्वाचा व प्रभावाचा तो प्रश्न असे. त्यावेळेस अशा प्रकारचे विधी सर्वच राजे आपल्या जाणत्या तांत्रिका कडून करवून घेत होते याचे अनेक दाखले प्राचीन वाड्मयातून व मध्ययुगीन कालखंडाचा इतिहासातून बघावयास मिळतात. राजे हे स्वतः तंत्र कला करीत नसतात तर त्यात पारंगत तांत्रिक हे राजासाठी ही कला/ विद्या वापरून सहाय्य करीत असत.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/80 प्राचिन आदिम निवासीयांच्या दैवतांचा अभ्यास 2021-12-25T12:37:42+00:00 Umakant Patil umakant.patil1965@gmail.com
सिद्धांत ही गणिताची एक पद्धती आहे. सिद्धांता बद्दल आपणास भृगू शास्त्रात माहिती मिळू शकते. संख्याशास्त्रातील तांत्रिक कले करीता प्रश्नोत्तर पद्धतीत यक्षिणी किंवा कर्ण पिशाचिनी द्वारे शिंपल्या सारख्या दिसणाऱ्या वस्तू त्यास मराठी गावरानी भाषेत कवड्या असे म्हणतात. बहुतेकदा भूत बाधा होऊ नये म्हणून गायीच्या गोऱ्याच्या शेपटीच्या केसा पासून दोरा तयार करून यात ह्या कवड्या बांधतात. ज्या गाई दुदुभत्या किंवा ज्या गाभिणी आहेत त्यांच्या गळयात या दोऱ्या बांधल्या जातात हा प्रकार भारतात जितका आढळून येत नाही त्या पेक्षा जास्त पटीने गोंडवनातील या पांढऱ्या अथवा लाल ठिपक्याच्या कवड्यांचा उपयोग देवतांना किंवा अलौकिक आत्म्यांना प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी केला जातो अशी श्रद्धा आहे. या कवड्यांना पांढऱ्या किंवा लाल देवांच्या समोरील राखिव जागेवर विशिष्ट मंत्र उच्चारण किंवा देवतांचे किंवा सैतानी आत्म्याचें नामौचारण करून अभिमंत्रित केल्यावर फेकतात व त्या कवड्यांच्या चीत-पट या संख्यवरून या जमातीचे बैगा व तांत्रिक लोक सामान्य जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देतात.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/81 गोंड जमातीतील सामाजिक व्यवस्थापन व विश्वासाचे अध्ययन 2021-12-25T12:41:35+00:00 Vidya Netam netamvidya75@gmail.com
अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून प्रजेला कृषी विकासात्मक धोरण आखून शेतीची प्रगती केली. इतकेच काय पण राजे हे धार्मिक असल्याने प्रत्येक जाती वर्गास वेगवेगळे देवळे-रावळे त्यांनी बांधून दिली आहेत. जनतेस सुरक्षा सुद्धा त्यांनी देउन जंगलाचे व पशूचे संवर्धन व संरक्षणही केले आहे. ज्या जमातीस आपण तुच्छ समजतो किंवा हिंदू संस्कृतीप्रमाणे शूद्र म्हणतो ती आपली विकृत मानसिकता आहे. प्रत्यक्षात ही जमात शुद्र व चार्तुयवर्णात मुळीच मोडत नाही. तरी त्यांचा आपण उपहास करून त्यांना जंगली म्हणतो म्हणजेच कुठेतरी आपणच जंगली व क्रूर मानसिकतेने ग्रस्त आहोत. आज ह्या जमाती वर ही अवस्था का आली व ती कोणी आणली हे आपणास समजले तर आपण स्वतः शरमेने मान खाली घालण्यास बाध्य होऊ ही वास्तविकता आहे.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/82 गोंड जमातीची पुरातन सामाजिक व्यवस्था व रितीरिवाज 2021-12-25T12:47:35+00:00 Pradeep Masram pradeep.masram99@gmail.com
प्राचीन गोंडवानातील या जमातीच्या कला व संस्कृतीचा आपण अभ्यास केला आहे. आमची आशा आहे की संशोधकांना या पुस्तकाचा मार्गदर्शक म्हणून फायदा होईल व खऱ्या अर्थाने ही जमात काय आहे हे सत्यार्थाने कळून येईल. यावरून आपल्या मनात या जमाती बद्दल असलेल्या चुकीच्या कल्पना व गैरसमज दूर होण्यास मदत मिळेल या समाजाची पावित्र्य राखण्यात आपणही योगदान देऊ शकाल हे आपल्या मनास पटवून येईल. लेखकाने अत्यंत मेहनत घेउन सत्यावर आधारित ही माहिती सुशिक्षितां पर्यंत पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/83 गोंड जमातीच्या गोंदन कलेचा सामाजिक अभ्यास 2021-12-25T13:14:28+00:00 Joseph Paul paul.joseph901@gmail.com
मानवी शरीरावर गोंदण (Tattoo) करण्याची पद्धत फारच प्राचीन आहे. मानव समुह हा गटागटाने जेंव्हा राहू लागला तेंव्हा त्याच्यातील सुप्त गुण हे हळूहळू विकसित होऊ लागलेत. यातूनच चित्रकला व त्यानंतर शरीरावरील गोंदण कला ही सुद्धा निर्माण झाली. सध्या ही कला फॅशन म्हणून जरी आधुनिक युवक व युवती करून घेत असली तरी पण मुळात ही पद्धत आफ्रिका, गोंडवाना ट्रॅक वरील जमातींमध्ये विशेषता आढळून येते. इतकेच नाही तर ती विद्या ही लोक प्रिय देखील आहे. प्रत्यक्षात गोंदण प्रक्रिया सोपी नाही. प्राचीन काळी पुरुष पुरुषाकडून व स्त्री स्त्रियांकडून गोंदवून घेत. त्यासाठी या समाजात गोंदण करणारे प्रशिक्षित पुरुष व स्त्रिया असत. याचे कारण गोंदन हे आधुनिक काळा सारखे प्राचीन काळात नव्हते. सध्या इलेक्ट्रिक मशीन द्वारे गोंदण‍ शरीरावर काढून घेतात परंतु प्राचीन काळी ते बाबळीचा काटा भराटी चा काटा याचा गोंदण्याच्या जागेवर टोचून चित्र काढीत असत. गोंदण काढण्याच्या अनेक धार्मिक व अधार्मिक मान्यता या जमातीत बघावयास मिळतात.
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021 https://agpegondwanajournal.co.in/index.php/agpe/article/view/84 गोंड जमातीच्या विवीध पेयांचा सामाजिक-धार्मिक दृष्टिकोनाचा अभ्यास 2021-12-25T13:42:43+00:00 Arvind Markam markam_arvind87@gmail.com
भारत देशात गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास दारूचे सेवन उच्चभ्रू लोक पार्टीतून मजा मारणारी बडी मंडळी आहे यावर बंदी का आणली जात नाही मात्र जे आर्थिक पीडित आहे त्यांच्या हक्कावर दबावतंत्र आणून त्यांचे स्वतःचे अन्नघटक बंद करणे कितपत न्याय सिद्ध आहे याचा विचार व्हावा. या भागातील काही समाजसेवक सरकारकडून या दारूबंदी नावाखाली लाखो रूपयांचे फंड घेतात मात्र त्यांच्या भेटीस येणारे परदेशी पाहुणे काय फक्त पाणी पिऊन व डाळ भात खाऊन राहतात. याच्याकडे जंगली जनावरांचे मांस व उच्च प्रतीची इंग्रजी अल्कोहल कशी काय पोहोचते यांच्या आश्रमातून हे पदार्थ कसे काय पुरविले जातात? यावर बंदी नको का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दारूबंदी फक्त चंद्रपूर व गडचिरोली का गोवा, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, केरळ, तमिळनाडू यासह चंद्रपूर व गडचिरोलीला लागून असलेल्या इतर भंडारा,गोंदिया, नांदेड, अमरावती या जिल्ह्यात का नको. संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी महाराष्ट्र सरकार का करू शकली नाही की तसे मनोधैर्य त्यात नाही. अबोल व मुकी अर्थाजनाने गांजलेली या जनतेवर तुमचा आसूड का? या वर अन्याय का? आपण घरात लपून दारू घ्यायची व बाहेर भाषणात नकटेपणा मिरवायचा हे पुढार्‍यांचे कार्य समाजसेवा आहे का?
2021-12-27T00:00:00+00:00 Copyright (c) 2021