धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी
Keywords:
Government resolution, AdministrationAbstract
जनतेच्या कल्याणासाठी तसेच राष्ट्र विकासासाठी देशातील सरकारे विविध धोरण आखत असतात. आखलेले मार्ग उपलब्ध पर्यायातून तसेच नवनवीन युक्त्यांद्वारे धोरणांचे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करत असतात.एखाद्या धोरणाची अंमलबजावणी ही प्रशासनाचा आत्मा असते. धोरणांची अंमलबजावणी ही स्वयंचलित नसते तर तिची जाणीवपूर्वक अंमलबजावणी करावी लागते.धोरणाची अंमलबजावणी खूप अडचणी येत असतात. धोरणांचा कार्यक्षम अंमलबजावणीसाठी आज्ञेची एकता समन्वयक क्षमता आणि नियंत्रण यांची नितांत गरज असते.
एखाद्या धोरणाची यशस्वीता त्या धोरणाच्या योग्य अंमलबजावणीवर अवलंबून असते. जर एखादे धोरण चांगले यशस्वी झाले तर तिच्या अंमलबजावणीतील दोष कमी होते असे म्हणता येईल या उलट जर एखादे धोरण कमी यशस्वी व अप्रसिद्ध झाले तर तो दोष धोरण अंमलबजावणीत होता असे म्हणावे लागेल.विकसनशील आणि अविकसित देशापेक्षा विकसित देशाची धोरण तयार करण्याची पद्धती ही अधिक प्रबळ विकसित झालेले असते, कारण विकसित देशात धोरणाचा निर्मितीसाठी लागणारे प्रबळ अशा मूलभूत सुविधांचा विकास झालेला असतो धोरण निर्मितीच्या टप्प्यापासून धोरणाच्या मूल्यमापनापर्यंत विविध टप्प्यांमध्ये अडथळे जाणवतात.
Downloads
Downloads
Published
How to Cite
Issue
Section
License
Copyright (c) 2023 Rushikesh K. Ghorpade, Dr. Balasaheb S. Bhingole
This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.